loader
Breaking News
Breaking News
Foto

जी.जी.पी.एसमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

रत्नागिरी : रत्नागिरीतील जी.जी.पी.एसच्या ‘स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी’ विभागाने आपल्या चिमुकल्यांसोबत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. आजच्या या पिढीलासुद्धा विठुराया आणि आषाढी वारीचे महत्त्व कळावे यासाठी वारकर्‍यांची वेशभूषा करून आणि विठ्ठलाची पालखी घेऊन चिमुकल्यांनी विठुरायाच्या जयघोषात दिंडी काढली. अभंगांवर चिमुकल्या वारकर्‍यांनी ताल धरला होता. विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘जय जय राम कृष्ण हरी’ गजराने सारा परिसर दुमदुमून गेला होता. पावसाच्या सरींची हजेरी जणू विठुरायानेच या चिमुकल्यांना दिलेला आशीर्वाद. या सोहळ्यात मुलांनी आनंदाने आपला सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर प्रायमरी विभागाच्या प्रमुख अपूर्वा मुरकर,प्री-प्रायमरी विभागाच्या प्रमुख शुभदा पटवर्धन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg