loader
Breaking News
Breaking News
Foto

कोतळूक येथील कै. दत्तात्रय ओक यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

वेळणेश्वर - गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी माजी अध्यक्ष, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी सरपंच दत्तात्रय ऊर्फ अण्णा यांच्यावर कोतळूक स्मशानभूमीत विविध स्तरातील मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनसंघ ते भाजपा, माजी आमदार कै तात्यासाहेब नातू, माजी आमदार डॉ विनय नातू यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय ओक यांच्या निधनामुळे कोतळूक गावासाठी पोकळी निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ सहकारी केशवकाका भावे, माजी आमदार डॉ विनय नातू, भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, प्रशांत शिरगावकर, यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर, राजन दळी, नासीमशेट मालाणी, चंद्रकांत बाईत, रघुशेट ओक, बाळकृष्ण ओक आदींसह दर्शन घेऊन सर्वपक्षीय मंडळी, संघ, विश्व हिंदू परिषद, ब्राह्मण सहाय्यक संघ कोतळूक गावातील नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक वर्षे भाजपाचे काम केल्याने त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या देहावर भाजपाच्या झेंडा परिधान करण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg