loader
Breaking News
Breaking News
Foto

निरोगी सुदृढ बालक निर्माण होण्यासाठी आईचे दूध अमृततुल्य- अनुराधा नारकर

मालवण(प्रतिनिधी)- निरोगी सुदृढ बालक निर्माण होण्यासाठी आईचे दुध हे बाळासाठी सर्वोत्तम अन्न असून ते अमृततुल्य असल्याचे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी आचरा येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आचरा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात अनुराधा नारकर या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, प्रकल्प अधिकारी मालवण उल्का खोत, ग्रा. पं. सदस्या पुर्वा तारी, सायली सारंग, यांसह आचरे गावातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रकल्प अधिकारी उल्का खोत यांनी सप्ताहाचे महत्त्व पटवून देताना मातांना स्तनपानाचे महत्त्व समजून सांगितले. तसेच बाळाला जन्मानंतर तासाभरात स्तनपान सुरू करणे किती महत्त्वाचे आहे तसेच पहिल्या सहा महिन्यात आईचे दूध बाळाला पाजणे गरजेचे असल्याचे महिलांना पटवून दिले. या कार्यक्रमात मान्यवरांनी बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानिमित्त पोषण आहार आणि रांगोळी प्रदर्शनातून योग्य आहाराबाबत जागृती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg