loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वीत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त या कार्यक्रमाच्या प्रारंभीस शालेय स्वराज्य मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री सोहम खरडे याच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार शालेय स्वराज्य मंत्रिमंडळ उपमुख्यमंत्री पूर्वी फडके हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमप्रसंगी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिक शर्वरी करगुटकर, उपशिक्षिका भारती तायशेटये, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती. लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्यानंतर मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर उपशिक्षिका भारती तायशेटये, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर आदी शिक्षकांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मिलिंद चंदुरकर, शिक्षण तज्ञ मंगेश म्हादये यांंनी भेट दिली आणि शाळेत राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाबाबत सर्व शिक्षकवृंदांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg