loader
Breaking News
Breaking News
Foto

कट्टा येथे ८ रोजी ‘कॅन्सर जनजागृती व तपासणी महाशिबीर’

मालवण(प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कॅन्सरविषयी जनजागृती करून वेळेवर निदान व उपचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सेवास्पर्श फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ माहीम येथील ‘डिस्ट्रिक्ट ३१४१’ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने कॅन्सर जनजागृती व मोफत तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे महाशिबिर शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. ओम गणेश साई मंगल हॉल, कट्टा येथे होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरात टाटा हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून कॅन्सरची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, लक्षणे आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांना थेट समुपदेशनाची संधी उपलब्ध होणार असून, शिबिरात आवश्यकतेनुसार सीबीसी, आरबीएस, एलएफटी, क्रिएटनीन तसेच कॅन्सर मार्कर यांसारख्या रक्त तपासण्या करण्यात येणार असून, फायब्रोस्कॅन या अत्याधुनिक, वेदनामुक्त तंत्रज्ञानाद्वारे यकृताच्या आरोग्याची तपासणीही केली जाणार आहे. शिबिरासाठी येणार्‍या नागरिकांसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मोफत आरोग्य उपक्रमाचा लाभ घ्यावा, आपले कुटुंबीय व परिचितांनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आरोग्य शिबिरासाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ७८७५२४११८२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सेवास्पर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg