loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचनदी येथील श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक शाळेत 'PRA' चे प्रात्यक्षिक संपन्न

(दापोली - सागर गोवळे) - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा’(RAWE) अंतर्गत पंचनदी येथील श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक शाळेत ‘सहभागी ग्रामीण मूल्यांकन’ म्हणजेच PRA (Participatory Rural Appraisal) चे विशेष प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले. ग्रामीण भागातील शेती, सामाजिक परिस्थिती आणि संसाधनांचा अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी शालेय विद्यार्थी व स्थानिकांना ग्रामीण मूल्यमापनाच्या विविध पद्धतींची प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली. हा प्रात्यक्षिक कार्यक्रम उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. गार्गी शिर्के, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. निलेश दळवी, डॉ. सुमेध थोरात व डॉ. प्रज्ञा गुडदे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थिनींचे विशेष परिश्रम कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीकन्या श्रेया कर्पे, उन्नती धोडी, निशा घोरपडे, स्वप्नाली जाधव, कोमल कडू, गायत्री कुंभार, रसिका मासये, समृद्धी आंबेकर, आदिती आंब्रे, श्रुती गोरीवले, सानिया राहटे, प्राची येलवे आणि सोनाली खर्चे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रात्यक्षिकाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण विकासात कृषी विद्यार्थ्यांचे योगदान आणि अशा उपक्रमांचे महत्त्व उपस्थितांनी आवर्जून नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg