loader
Breaking News
Breaking News
Foto

वाढदिवसाचा अनोखा उपक्रम! भाजप युवा मोर्चा उत्तर तालुकाध्यक्ष स्वप्नील सुर्वे यांच्याकडून ६० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - ​वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा स्वीकार करण्याचा किंवा औपचारिकता जपणारा दिवस नसून, समाजाशी बांधिलकी जपण्याची एक उत्तम संधी आहे. याच भावनेतून भाजप संगमेश्वर उत्तर युवा मोर्चाचे धडाडीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सुर्वे यांनी आपल्या २६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक विशेष उपक्रम राबवला. कोंड-असुर्डे शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला पाठबळ देण्यासाठी ६० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करून त्यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड दिली. ​आजकाल राजकीय आणि सामाजिक पटलावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला मोठमोठे फ्लेक्स, भपकेबाज कार्यक्रम आणि शक्तीप्रदर्शनाची होड लागलेली दिसते. मात्र, स्वप्नील सुर्वे यांनी या पारंपरिक चौकटीबाहेर जात 'सकारात्मक राजकारण आणि सामाजिक जाणीव' यांचा मेळ घातला. भपकेबाजीला फाटा देत, थेट शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आणि त्यांना अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य भेट देऊन त्यांनी वाढदिवसाचा हा दिवस अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाला असून विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रुची निर्माण व्हावी, त्यांच्यातील शिकण्याचा उत्साह द्विगुणित व्हावा आणि गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. वह्यांचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललेला आनंद हा वाढदिवसाच्या कोणत्याही शुभेच्छांपेक्षा मोठा आणि समाधानकारक असल्याचे यावेळी उपस्थितांनी अनुभवले. ​या कार्यक्रमाप्रसंगी भाजप संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम, कोंड-असुर्डे शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक करंडे, सर्व शिक्षकवृंद, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी भाजप संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "आजच्या काळात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाकडून समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. स्वप्नील सुर्वे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दाखवलेली ही सामाजिक जाणीव इतर कार्यकर्त्यांसाठीही आदर्शवत आहे. राजकारणासोबतच समाजकारणाचा हा वारसा असाच पुढे सुरू राहो," अशा शब्दात त्यांनी स्वप्नील सुर्वे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. ​तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानताना मुख्याध्यापक करंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg