रत्नागिरी(जमीर खलफे)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या २२ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. वेदांत संदीप पोवार याने २७० गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यासोबतच ईशा गुर्जर हिने जिल्ह्यात पाचवा, मनस्वी देसाई हिने आठवा क्रमांक मिळवला. आज या विद्यार्थ्यांचे शाळेत जंगी स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या डोक्यावर फेटा बांधला, ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत, फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. यानंतर भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, सचिव धनेश रायकर, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, दादा कदम, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, सर्व शिक्षक, पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थी असे (नाव व जिल्हा यादीतील क्रमांक)- वेदांत संदीप पोवार (प्रथम), ईशा आशुतोष गुर्जर (५), मनस्वी जीवन देसाई (८), रिया उदय काजरेकर (९), ओवी हेमंत धुळप (११), चैतन्य धीरज सालपेकर (१४), राधेय रवींद्र कीर - (१९), मुक्ता नितीन पळसुलेदेसाई (३३), अनिकेत पराग गोडबोले (३४), दूर्वा गौरांग आगाशे (५३), भक्ती मयुरेश भुर्के - (६१), ज्ञानेश शैलेश काळे (६३), श्रील प्रसाद भोंडवलकर (७६), आचमन हर्षल पेढे (७८), ध्रुवा गुरुप्रसाद चौगुले (७९), हितांशू विवेक खरोटे (८३), संचित अनिकेत चौगुले (८८), गौरांग विनयकुमार आजगेकर (९०), ओवी चंद्रकांत राऊत - (९२), सोहम निलेश वैद्य (९४), प्राप्ती निनाद पास्ते (९५), यशश्री चंद्रशेखर डिचोलकर (११५).
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, ईशा रायंगणकर, गीता सावंत, भारती खेडेकर, सोमनाथ दुकले, चारुशीला पेठे, सुधीर शिंदे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यांचेही कौतुक या वेळी संस्थेतर्फे करण्यात आले. यापूर्वी चौथीची शिष्यवृत्ती सुरू होती. तेव्हासुद्धा एवढे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकत होते. नंतर ही परीक्षा इयत्ता पाचवीसाठी झाली होती. पण यंदा पुन्हा ही परीक्षा सुरू झाल्यानंतर फक्त पाच महिन्यात विद्यार्थ्यांनी हे कठोर परिश्रम व चांगला अभ्यास करून व शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे दणदणीत यश मिळवले आहे, असे डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी सांगितले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.