loader
Breaking News
Breaking News
Foto

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते फिजीशीयन असल्याने याचा मोठा फायदा सावंतवाडीतील रुग्णांना होणार आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. रेड्डी हे मधुमेह व हृदयरोग तज्ञ असून त्यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्याकडे वैद्यकीय अधिक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्यानंतर डॉ. संदीप सावंत यांच्याकडे या पदाचा पदभार होता. आता डॉ. रेड्डी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. याबाबत आमदार दीपक केसरकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या प्रयत्नातून कायमस्वरूपी फिजिशियन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयस प्राप्त झाल्याची माहिती रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य देव्या सूर्याजी यांनी दिली. तसेच युवा रक्तदाता संघटनेकडून डॉ. रेड्डी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष देव्या सुर्याजी, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, वसंत सावंत, बाबा आल्मेडा, भास्कर आमुणेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg