loader
Breaking News
Breaking News
Foto

दि.न्यू इंडिया एशूरन्स कंपनी ली.चा ‘१०८ वा फाउंडेशन डे’ खेड मुकादम लँडमार्क येथील शाखेत उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) - दि.न्यू इंडिया एशूरन्स कंपनी ली.चा १०८ वा फाउंडेशन डे खेड मुकादम लँडमार्क येथील शाखेत खेडच्या प्रथम नागरिक माधवीताई बुटाला यांच्याहस्ते केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खेड शाखा अधिकारी श्रेयस मोरे आणि हनीफ घनसार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी युवा उद्योजक शैलेश भाई मेहता, माजी नगराध्यक्ष बिपीनदादा पाटणे, युवा उद्योजक शम्सभाई मुकादम, सिकंदर मुसा, प्रमोदभाई बुटाला, उत्तमकुमार जैन, लायन्सचे माजी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, लायन्सचे अध्यक्ष अविनाश दळवी, सुरेशजी चिकणे, नगरसेवक आरिफभाई मुल्लाजी, नगरसेविका संजना कुडाळकर, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, उपाध्यक्ष अश्विनी वडके, विमाप्रतिनिधी सचिन हेरवाडे, सतीश कदम, दुर्वेश पालेकर, खतीब सर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेड शाखा अधिकारी श्रेयस मोरे आणि हनीफ घनसार व कर्मचारी, तसेच विमा प्रतिनिधी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg