loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड एसटी स्टॅण्ड आवारात पडलेले खड्डे तुडवतच प्रवाशांना करावा लागतोय प्रवास

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड एसटी स्टॅण्डच्या आवारात पडलेले भले मोठाले महाकाय खड्डे बुजवून टाकण्यात एस.टी. प्रशासनाने केलेल्या हयगयीमुळे प्रवाशांच्या सुरक्षीत प्रवासाची हमीच राहीलेली नाही. याचे विदारक चित्र सध्या मंडणगड एसटी स्टँड आवारात स्पष्टपणे दिसून येत आहे. मंडणगड तालुका ठिकाण असलेल्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तालुक्यातील गावांसाठी मध्यवर्ती असे एक मंडणगड एस. टी.स्टँड आहे. या एसटी स्टँडमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागात थेट जाणार्‍या एस. टी. महामंडळाच्या बसेस सतत धावत असतात. तसेच मुंबई, पुणे, ठाणे आदी मोठ्या शहरांकडे जाण्याकरिता लांब पल्ल्याच्या बस येथून सोडल्या जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून संबोधल्या गेलेल्या एस.टी. बसेसची येथून अहोरात्र ये-जा सुरु असते. त्यामुळे प्रवास करणार्‍यांना एसटी स्टँड येथे येऊनच बस पकडावी लागते. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्यांना येथे उतरावे लागते. विद्यार्थी सवलतींच्या पासेसमुळे, जेष्ठ नागरिकांना मिळाणा-या सेवांच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यी, जेष्ठ नागरिक तसेच गावा गावातील प्रवासी हे सुरक्षित प्रवास म्हणून आणि थेट गावातून तालुका ठिकाणी तसेच परतीच्या प्रवासासाठी एसटी बसेसचाच पर्याय स्वीकारतात, कारण दुसरा कोणता पर्यायच नाही. त्यामुळे मंडणगड एस टी स्टँड आवारात येवूनच प्रवास करावा लागतो आहे.

टाईम्स स्पेशल

मात्र मंडणगड एस.टी. स्टॅड च्या आवारात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांचा अडथळा पार करूनच एसटी बस पकडावी लागते. खड्ड्यांमध्ये पाणी तुंबून राहत असल्याने एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी बस स्टॅण्ड आवारात पडलेले खड्डे बुजवून प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी एस.टी. स्टॅण्ड आवारातील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी पूर्णपणे बुजवून टाकावेत अशा प्रकारच्या प्रवासी संघटनेच्या मागणीने जोर धरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg