loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. आदर्श शाळा लांजा नं. २ आगरवाडी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - पार्श्व अनुकंपा ट्रस्ट मुंबई व नाना नानी शांती निवास लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने दानशूर व्यक्तिमत्व शशांक रामाने यांच्या वतीने जिल्हा परिषद आदर्श शाळा लांजा नंबर २ आगरवाडी या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला लांजाचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर कवचे, शशांक रामाने, सेवानिवृत्त शिक्षक पन्हाळेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्चना बापेरकर तसेच इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे स्वागत केले. इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक दिनेश झोरे यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg