loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई, ३८ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोमध्ये तब्बल 800 हून अधिक गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स पकडून सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांनी फिर्याद दाखल केली असून या कारवाईमध्ये तब्बल 38 लाख 40 हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई तळेरे - औदुंबरनगर येथे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आयशर टेम्पो देखील हस्तगत करण्यात आला असून पोलिसांनी एकूण 55 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नितीश रमेश तांबोसकर (37, सराटे - टेंबवाडी, ता. सावंतवाडी) याच्यावर विनापरवाना गोवा बनावटीची दारू वाहतुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस कणकवली महामार्गावरव तळेरे औदुंबर नगर या ठिकाणी कार्यरत असताना दुपारी 3. 55 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो आढळून आला.

टाईम्स स्पेशल

या टेम्पोला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल ब्ल्यू मार्ट व्हिस्की चे तब्बल 800 गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस हवालदार गवस, बिर्जे, सरमळकर, शेटे, परब, खडपकर आदीच्या पथकाने केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg