loader
Breaking News
Breaking News
Foto

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा तहसील कार्यालय अभ्यास दौरा संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा तहसील कार्यालय अभ्यास दौरा संपन्न झाला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयाची रचना, कार्यपद्धती आणि नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवांची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने गुरुवार दि. ३० जुलै २०२६ रोजी वैभववाडी तहसील कार्यालय येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे तहसील कार्यालयात स्वागत करण्यात आले. नायब तहसीलदार निकम यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाची कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि विविध विभागांची सविस्तर माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागात नेऊन संबंधित अधिकाऱ्यांमार्फत त्या विभागाचे काम आणि कार्यपद्धतीची ओळख करून दिली. त्यामध्ये आवक-जावक विभाग, सेतु सुविधा विभाग, पुरवठा विभाग, निवडणूक विभाग, अभिलेख विभाग, संजय गांधी निराधार विभाग, कुळ वहिवाट, महसूल विभागातील विविध विभाग, नायब तहसीलदार व तहसीलदार कार्यालय यांची माहिती दिली. शेवटी तहसीलदार दालनात तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी महसूल प्रशासनातील तहसीलदारांची भूमिका, जबाबदाऱ्या, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचे योगदान, तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची व शंकांचे समाधानकारक निरसन केले.

टाईम्स स्पेशल

यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस. एन. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. राजे, डॉ. एस. एम. करपे यांनी सहभागी होऊन अभ्यास दौरा यशस्वी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg