दापोली (सागर गोवळे) - ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी सखी गटाच्या वतीने शेतकरी बंधूंसाठी उपयुक्त व अपायकारक कीटकांची ओळख आणि त्यांच्या व्यवस्थापनाबाबत विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. शेतीतील पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकादरम्यान कृषी सखी गटातील विद्यार्थ्यांनी परिसरातील प्रमुख पिके असणाऱ्या आंबा, काजू आणि भात पिकांवर पडणाऱ्या विविध अपायकारक कीटकांची माहिती दिली. यामध्ये कीटकांची ओळख, पिकांवर दिसणारी प्रादुर्भावाची लक्षणे, होणारे नुकसान आणि त्यावर करावयाचे प्रभावी व शिफारस केलेले नियंत्रण उपाय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे, शेती मित्र असणाऱ्या मधमाशी, लेडीबर्ड बीटल (लेडीबर्ड भुंगेरे) आणि ग्रीन लेसविंग यांसारख्या उपयुक्त कीटकांचे संवर्धन का करावे, परागीकरण (Pollination) प्रक्रियेत त्यांचे असणारे योगदान आणि नैसर्गिकरीत्या जैविक कीड नियंत्रण करण्यातील त्यांची भूमिका प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्यात आली. या कार्यक्रमाला स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील अनुभव मांडले व कीड व्यवस्थापनाबाबतच्या शंकांचे निरसन करून घेतले. फोटो, पोस्टर्स आणि माहितीपत्रकांच्या (Leaflets) मदतीने दिलेली माहिती अत्यंत क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगणारी ठरली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सखी गटातील विद्यार्थिनी शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम.मुस्कान कसोटीया आणि नित्या राज यांनी विशेष परिश्रम घेतले व प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींबद्दल मोठी जागरूकता निर्माण झाली. रासायनिक औषधांचा अतिवापर टाळून उपयुक्त कीटकांचे जतन करणे शाश्वत शेतीसाठी किती गरजेचे आहे, असा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.