loader
Breaking News
Breaking News
Foto

साठरे बांबर येथे जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे रुग्णसेवा साहित्य प्रदान कार्यक्रम संपन्न

साठरे बांबर- सोमवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी तर्फे पाली जवळील साठरे बांबर पंचक्रोशी साठी, रुग्ण सेवा साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम, साठरे बांबर येथील कपिल वस्तू बुद्ध विहारच्या संकुलामध्ये संपन्न झाला. या मदतीमुळे साठरेबांबर पंचक्रोशीच्या दुर्गम भागातील रुग्णांना हे सेवा साहित्य यापुढे तातडीने उपलब्ध होणार आहे. योजक असोसिएट्सचे श्रीकांत भिडे आणि त्यांची कन्या राधिका भिडे यांनी तिच्या वाढदिवसानिमित्त पन्नास हजारांची भरगच्च मदत केली आणि रत्नागिरी ग्रुप यांच्या माध्यमातून आज साठरेबांबर पाली येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांना रुग्ण सेवा साहित्य प्रदान करण्यात आले. यामध्ये, दोन गादी उशी सहित फोल्डिंग कॉट्स, तीन कंमोड चेअर्स, दोन व्हील चेअर्स, तीन वॉकर, दोन फोल्डिंग काठ्या, ट्रॉलीसहीत स्टेचर, आय व्ही स्टॅण्ड आणि इतर साहित्य देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी परिसरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या, जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी, या संस्थेतर्फे सलग दुसर्‍या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. गतवर्षी राजापूर जवळील साखरी नाटे येथे हा उपक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष महेश दामले, सचिव पराग गोडबोले, खजिनदार संतोष कदम, माजी अध्यक्ष सुनील सहस्त्रबुध्दे, लक्ष्मीकांत भुते, प्रवीण डोंगरे आणि विनय जोशी तसेच सदस्य विजय पोकळे, स्पेशल कमिटी मेंबर मिलिंद सावंत आणि संजय पाटणकर, फेडरेशन अध्यक्ष गजानन गिड्ये, उपाध्यक्षा सौ. माधुरी कांबळे हे उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

मौजे साठरे बांबर पंचक्रोशी तर्फे बौद्ध विकास मंडळ ग्रामीण /मुंबई मंडळाचे अध्यक्ष नथुराम सावंत, उपाध्यक्ष अमोल कांबळे, सचिव संजू सावंत, सहसचिव राहुल सावंत, कोषाध्यक्ष चंद्रमणी सावंत, हिशोब तपासणीस करण सावंत, सल्लागार सुनील सावंत, कांचन सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नथुराम सावंत, अनंत सावंत उपस्थित होते. साठरे बांबर येथील ग्रामस्थ यांनी राधिका भिडे, योजक असोसिएट्स आणि जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी संस्थेचे, या उपक्रमा अंतर्गत दिलेल्या मदती बद्दल आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg