loader
Breaking News
Breaking News
Foto

मोटर लोडर कामगारांनी सफाईचे काम निषेध अंतर्गत स्विकारावे : डॉ. संजय बापेरकर

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - एरियाबेसच्या नावाखाली मोटर लोडर कर्मचार्यांना त्यांचे नियोजित काम न देता सेक्शन चौकीवर जबरदस्तीने पाठवुन, रस्ते सफाई चे काम देणे पालिकेच्या जी/दक्षिण विभागात सुरु झालेले आहे. याबाबत धीरज बांगर, कार्यकारी अभियंता (घ.क.व्य.) यांच्या सोबत चर्चा केली असता, वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसारच अशी कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे याविरोधात आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नसल्याने, ज्या विभागातील मोटर लोडर कामगारांना ‘सेक्शन चौकी किंवा अन्य ठिकाणी पाठवले जात असेल त्यांनी सदर काम निषेध अंतर्गत स्विकारावे, असे आवाहन’मुंबई मनपा खाजगीकरण विरोधी समिती’चे निमंत्रक डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

आपल्या सह्यांचे निवेदन विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना डिस्पॅच ला द्यावे व त्याची झेरॉक्स प्रत समितीला तातडीने द्यावी, जेणेकरुन अन्य कागदपत्रांबरोबरच सदर निवेदन पुरावा म्हणुन कोर्टामध्ये सादर करता येईल व वरील खाजगीकरणाविरोधात स्टे ऑर्डर घेता येईल, असे डॉ. बापेरकर यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg