संगमेश्वर (सत्यवान विचारे) - पोलिस अधिकारी म्हणजे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे प्रशासनाचे प्रतिनिधी एवढीच त्यांची ओळख नसून, समाजाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्वही असते, याची प्रचिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या अनोख्या कृतीतून दिली. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे त्यांनी थेट चिखलात उतरून शेतकर्यांसोबत भातलावणी करत त्यांच्या श्रमांना मानाचा मुजरा केला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून अधिकृत दौर्यावर जात असताना मानसकोंड परिसरातील शेतामध्ये सुरू असलेली भातलावणी बगाटे यांच्या नजरेस पडली. त्यांनी वाहन थांबवून कोणताही औपचारिकपणा न ठेवता थेट शेतात प्रवेश केला. चिखलात उतरून त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला, त्यांच्या शेतीपद्धती, पावसाची स्थिती, शेतीसमोरील अडचणी आणि उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली.
यानंतर त्यांनी स्वतः नांगर हाताळत नांगरणीचा अनुभव घेतला. त्यानंतर शेतकर्यांसोबत खांद्याला खांदा लावून भातलावणीत सहभागी होत रोपांची लागवड केली. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आपल्या दैनंदिन जबाबदार्यांमधून वेळ काढून शेतकर्यांच्या श्रमात सहभागी झाल्याचे पाहून शेतकरी आणि ग्रामस्थ सुखद आश्चर्यचकित झाले. अचानक झालेल्या या भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेतकर्यांनी बगाटे यांच्याशी मनमोकळा संवाद साधत शेतीविषयक विविध प्रश्न मांडले. बगाटे यांनीही त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून शेतकर्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
कोकणातील भातशेती ही येथील संस्कृती, परंपरा आणि अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार आहे. या मातीत उतरून शेतकर्यांच्या कष्टाचा प्रत्यक्ष अनुभव घेत पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी समाजाभिमुख आणि लोककेंद्रित पोलिसिंगचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या कृतीचे शेतकरी, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक स्तरांतून कौतुक होत असून, पोलिस आणि जनतेतील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.


































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.