loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग बाजारपेठेत रस्त्यावर सिमेंट कॉंक्रिट खडी टाकणार्‍या मिक्सर वाहनांवर कारवाई करा

दोडामार्ग(प्रतिनिधी)- दोडामार्ग ते तिलारी मार्गावर गोवा येथील अनेक सिमेंट कॉंक्रिट मिक्सर वाहने ये जा करतात, या वाहनांमध्ये भरलेले सिमेंट कॉंक्रिट खडी खाली पडू नये, यासाठी संबंधित वाहन चालक कडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. यामुळे या मिक्सर वाहनातील सिमेंट कॉंक्रिट हे रस्त्यावर पडून यावरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत तेव्हा बेशिस्त सिमेंट कॉंक्रिट मिक्सर वाहनांवर दोडामार्ग पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवा दोडामार्ग तिलारी दरम्यान पावसाळ्यात देखील सिमेंट कॉंक्रिट मिक्सर वाहने बेजबाबदार पण सुरू आहेत. सदर चालक आपला मनमानी कारभार करत आहेत, सिमेंट कॉंक्रिट भरलेले चार पाच वाहने ये जा करतात यावेळी गाडी उभी केली की आतील सिमेंट कॉंक्रिट मिक्सर मधून चक्क रस्त्यावर पडत आहेत.

टाइम्स स्पेशल

दोडामार्ग ते तिलारी मार्गावर अनेक ठिकाणी अशा प्रकारे खडी सिमेंट कॉंक्रिट रस्त्यावर थर पडलेला बघायला मिळतो यात दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. मंगळवारी देखील मोठया प्रमाणात सिमेंट कॉंक्रिट मिक्सर मधून रस्त्यावर पडले यामुळे वाहन धारकांना कसरत करावी लागली. तेव्हा दोडामार्ग पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg