loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटना यापुढे बारा बलुतेदार, अठरा पगड जातींना सोबत घेत देशभर सक्रिय राहणार- सदानंदराव भोसले

खेड (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना या पुढे बारा बलुतेदार, अठरा पगड जातींना सोबत घेऊन सन्मान करत देशभर सक्रिय समाज कारण करेल, असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना भरणे नाका येथील गणेश मंगल कार्यालयात झालेल्या भव्य समाज मेळाव्यात राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले सांगीतले. या वेळी बोलताना भोसले यांनी सांगितले आपली संघटना पक्षविरहित समाज कार्य करीत असल्याने सध्या तरी राजकारण नको. योग्य वेळी योग्य उमेदवाराला आपण जाहीर पाठिंबा देत असतो. समाजहितबाधक भुमिका घेणार्‍यांनी आम्हाला गृहीत धरू नये. कार्यक्रमाचे संयोजक रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांचे गेली महिना भर समाजासाठीची धडपड वाखाणण्याजोगी होती. या पट्ट्याने भव्य दिव्य समाज बांधव मेळावा यशस्वी केलाच. शेकडो समाज बांधव यांनी संपुर्ण हॉल तुटुंब भरला होता. उपयुक्त हजारो नारळ आंबा चिकू रोपांचे वाटप या वेळी समाज बांधव शेतकर्‍यांना करून सर्वांना स्नेहभोजनाचा लाभ घेता आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सल्लागार बडोद्याचे सुरेश कदम, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. संध्याताई राणे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती बबनराव दळवी, रॅलीज इंडिया लोटे व्यवस्थापक प्रवीण पाटणकर, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे व्यवस्थापक शंकर जाधव, राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव, गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे, गुजरात राज्य युवा कार्याध्यक्ष करण पवार, बडोदे शहर उपाध्यक्ष राहुल भोसले, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार, जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार, जिल्हा सरचिटणीस अंकुशराव चाळके, जिल्हा सचिव विवेक कदम, तालुका सचिव दिपक यादव, तालुका संघटक राजेंद्र मोरे, शंकर निकम, युवराज गुजर, भागेश शिंदे, नामदेव महाराज सोंडकर, विश्वासराव मोरे, यशवंत मोरे, स्वामी भगवान बुवा जंगम यांच्या सह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg