loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय गीत गायन स्पर्धेत देवरुखचे ॲड. गिरीश गानू यांचा दमदार ठसा; अंतिम फेरीत पटकावला पाचवा क्रमांक

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘Seniors Have Talent’ संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील गीत गायन स्पर्धेच्या २१व्या पर्वात देवरुखचे ॲड. गिरीश गानू यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अंतिम फेरीत देशभरातील २४ स्पर्धकांमधून त्यांनी पाचवा क्रमांक पटकावत देवरुखच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरीनंतर ९० स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २४ स्पर्धकांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. अंतिम फेरीत स्पर्धकांसमोर विविध विषयांवरील गीते सादर करण्याचे आव्हान ठेवण्यात आले होते. प्रेम, राग, विवाह, जीवन, भारतीय स्वातंत्र्याचा सोहळा, निद्रा, भाऊ-बहीण अशा विविध विषयांवर आधारित गाणी स्पर्धकांनी सादर केली. अंतिम फेरीतील २४ स्पर्धकांमधून सर्वोत्तम १० स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये ॲड. गिरीश गानू यांनी पाचवा क्रमांक मिळवत आपले गायनकौशल्य सिद्ध केले.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देवरुखसह संगमेश्वर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशानंतर ॲड. गानू यांनी आपल्याला मतदान करणाऱ्या सर्व रसिकांचे आभार मानले. रसिकांनी दिलेले प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद यामुळेच हे यश मिळू शकले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg