संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ ने यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नवा इतिहास रचला आहे. गेल्या चार वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत यश हुलकावणी देत होते; मात्र शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक समीर ठसाळ यांच्या अथक परिश्रमांमुळे, नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या जिद्द व मेहनतीमुळे शाळेला प्रथमच घवघवीत यश प्राप्त झाले आहे. इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट असलेले सिद्धांत तांबे, मैत्री आडविलकर, माही गौरत आणि आद्या गोरीवले हे चारही विद्यार्थी पात्र ठरले असून शाळेने १०० टक्के निकालाची अभिमानास्पद नोंद केली आहे.
या यशामध्ये आद्या विनोद गोरीवले हिने २६२ गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या इतिहासात सुवर्णपान लिहिले आहे. शरीराने लहान असली तरी बुद्धिमत्ता, चिकाटी आणि कर्तृत्वाच्या जोरावर तिने मोठे यश संपादन करून "मूर्ती लहान; पण कीर्ती महान" ही उक्ती सार्थ ठरविली आहे. तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत सिया देवघरकर हिनेही पात्र ठरत शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक समीर ठसाळ यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरीवले, सदस्य मनोज जाधव यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यातही शाळेची अशीच सर्वांगीण आणि उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या गौरव सोहळ्यास असंख्य पालक, शाळेतील सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या या यशामुळे साखळोली गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.