खेड : खेड शहराच्या विकासामध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडत असून, खेड नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्या व्यापारी संकुलाला शिक्षणमहर्षी, माजी आमदार स्वर्गीय तु. बा. कदम यांचे नाव देण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव योगदानाची दखल घेत त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून या व्यापारी संकुलाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याने खेडवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. माजी आमदार स्वर्गीय तु. बा. कदम यांनी खेड तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती झाली पाहिजे, हा विचार त्यांनी कायम जपला. त्यामुळेच त्यांना खेड तालुक्यात ‘शिक्षणमहर्षी’ म्हणून मानाचे स्थान प्राप्त झाले.
शिक्षणाबरोबरच समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आजही आठवण केली जाते. त्यांच्या कार्याचा गौरव आणि पुढील पिढ्यांना त्यांच्या योगदानाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने व्यापारी संकुलाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. खेड नगरपालिकेच्या विविध विकासकामांना गती देताना शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. या संकुलाला स्वर्गीय तु. बा. कदम यांचे नाव दिल्यामुळे विकासकामासोबतच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव होणार आहे. या निर्णयामागे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मानले जात आहे. तसेच गृहराज्य मंत्री योगेशदादा कदम आणि खेड नगरपालिकेमधील नगराध्यक्षा आणि सर्व नागसेवक यांचे ही आभार कदम कुटुंबियांकडून मानण्यात आले.
तु. बा. कदम यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच खेडच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे. त्यामुळे व्यापारी संकुलाला स्वर्गीय तु. बा. कदम यांचे नाव देण्याच्या निर्णयाबद्दल कदम कुटुंबीयांकडून खेड नगरपालिका आणि संबंधित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. स्वर्गीय तु. बा. कदम यांच्या नावाने उभारण्यात येणारे हे व्यापारी संकुल भविष्यात खेड शहराच्या विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. तसेच या संकुलाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण कायमस्वरूपी जपली जाणार असल्याने हा निर्णय त्यांच्या कार्याला खर्या अर्थाने अभिवादन करणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘शिक्षणातून समाजविकास’ हा विचार प्रत्यक्षात आणणार्या स्वर्गीय तु. बा. कदम यांच्या नावाने उभारण्यात येणारे हे व्यापारी संकुल त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी स्मृती ठरणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.