loader
Breaking News
Breaking News
Foto

झी मराठी वाहिनीवरील अभिनेत्री विजया बाबर आणि साक्षी सुभाष यांनी तळवडे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसोबत पांडुरंगाच्या आनंदवारीत घेतला सहभाग

लांजा (संजय साळवी) - झी मराठी वाहिनीवरील सध्या गाजत असलेली कमळी या मालिकेतील कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर आणि तिची मालिकेतील जिवलग मैत्रीण निंगी अर्थातच अभिनेत्री साक्षी सुभाष या दोघी बुधवारी २९ जुलै रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लांजा तालुक्यातील तळवडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय येथे उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मराठीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार प्रणव रावराणे हा देखील उपस्थित होता. कमळी आणि निंगी या दोघीही विद्यालयातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना सर्वकाही विसरून विद्यार्थ्यांमध्ये अक्षरशः रममाण झाल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र आणि मुंबईस्थित प्रसिद्ध उद्योजक व तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था, मुंबईचे अध्यक्ष डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने बुधवारी २९ जुलै रोजी संपूर्ण दिवसभर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला झी मराठी वहिनीवरील सध्या गाजत असलेली कमळी या मालिकेतील कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर व तिची जिवलग मैत्रीण निंगी अर्थातच अभिनेत्री साक्षी सुभाष तसेच प्रसिद्ध विनोदी कलाकार प्रणव रावराणे हे मराठी कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. जगन्नाथभाई पेडणेकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मराठी कलाकारांचे विद्यार्थ्यांच्या पारंपरिक दिंडी नृत्याने स्वागत करण्यात आले. यावेळी ’झी मराठी’ चा ब्रँड व्हिडिओ तसेच आगामी मालिकांच्या प्रोमोचे स्क्रीनवर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक नृत्य सादर केली. यामध्ये कोकणची सुप्रसिद्ध लोककला म्हणून ओळखल्या जाणार्‍या जाकडीनृत्याचा समावेश होता. तसेच एकपात्री प्रयोग व एकांकिका असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थी, पालक आणि उपस्थित पाहुण्यांसाठी ’क्रांतीज्योती विद्यालय’ या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे २० फूट लांब आणि ८ फूट उंच आकाराच्या भव्य एलईडी स्क्रीनवर या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता शिक्षणाच्या चार भिंतींपलीकडील जगाचा अनुभव मिळावा, त्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि भविष्यात विविध क्षेत्रांत आपल्या कौशल्याच्या जोरावर यश संपादन करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg