संगलट(खेड)(इक्बाल जमादार)- रायगड जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने मोठी कारवाई करत मुंबई-गोवा महामार्गावर क्रश सँडची अवैध वाहतूक करणारे दोन डंपर जप्त केले. नियमानुसार चार ब्रास वाहतुकीची परवानगी असताना तब्बल आठ ब्रास क्रश सँडची वाहतूक होत असल्याचे तपासणीत उघड झाल्याने संबंधित वाहनांवर लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान MH47-BY1210 आणि MH46-BU7381 या दोन डंपरमधून क्रश सँडची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. वाहनांची कागदपत्रे, ई-रॉयल्टी पास आणि वाहतुकीसंदर्भातील परवानगीची पडताळणी केल्यानंतर नियमानुसार चार ब्रास क्रश सँड वाहतुकीची परवानगी असताना प्रत्यक्षात तब्बल आठ ब्रास क्रश सँडची वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित वाहनांनी महसूल नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महसूल विभागाने तात्काळ दोन्ही डंपर जप्त करून पुढील कारवाई सुरू केली.या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८(७) अंतर्गत दोन्ही वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचपट रॉयल्टीच्या निकषानुसार, प्रत्येकी ७० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यासोबत प्रत्येकी दोन लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावण्यात आला आहे. या कारवाईची माहिती तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली.
दरम्यान, तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा मालक रफिक अब्बास सत्तार असल्याचे समोर आले आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यात अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करून गौण खनिजाची वाहतूक करणार्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही महसूल विभागाने दिला आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.