loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी: आता सर्व पोस्ट ऑफिसमध्ये भरता येणार ‘महानगर गॅस’चे बिल!

रत्नागिरी (जमीर खलफे) - रत्नागिरी शहरातील महानगर गॅसच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठा दिलासा देणारी बातमी आहे. आता गॅस बिल भरण्यासाठी लांबच लांब जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही. शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसची मासिक बिले भरण्याची नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रत्नागिरीतील सुमारे १०,००० ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. रत्नागिरी शहरात दिवसेंदिवस महानगर गॅसच्या ग्राहकांची संख्या वेगाने वाढत असून नागरिक विविध भागांत वास्तव्यास आहेत. विद्यमान बिल भरणा केंद्रांपर्यंत पोहोचणे अनेकदा गैरसोयीचे ठरत होते. नागरिकांची हीच अडचण ओळखून महानगर गॅसने भारतीय डाक विभागाशी संपर्क साधून पोस्ट ऑफिसद्वारे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय डाक विभागाचे व्यापक नेटवर्क आणि नागरिकांशी असलेला दैनंदिन संपर्क लक्षात घेता या प्रस्तावाला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यानुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय डाक विभाग आणि महानगर गॅस यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून ही सुविधा तात्काळ लागू करण्यात आली आहे. या करारावर रत्नागिरी विभागाचे अधीक्षक डाकघर ज्ञानेश कुलकर्णी आणि महानगर गॅस लिमिटेडचे जीएम हेड आशिष प्रसाद यांनी सह्या केल्या. या सुविधेमुळे आता ग्राहकांना आपल्या घराजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सहजरीत्या बिल भरता येईल. लांबच्या केंद्रावर जाण्याची गरज उरणार नसल्याने नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि शारीरिक श्रम वाचणार आहेत. यामुळे दैनंदिन व्यवहारात अधिक सुलभता निर्माण होणार आहे. या करारामुळे रत्नागिरी शहरातील सर्व महत्त्वाच्या आणि स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये गॅस बिल भरता येणार आहे.

टाईम्स स्पेशल

यामध्ये: रत्नागिरी प्रधान डाकघर, रत्नागिरी कलेक्टरेट एस.ओ., शिवाजीनगर एस.ओ., एम.आय.डी.सी. (रत्नागिरी) एस.ओ... शहरांमधील इतर सर्व उप-डाकघरांचा समावेश आहे.भारतीय डाक विभागामार्फत सध्या स्पीड पोस्ट, पार्सल, टपाल जीवन विमा, बचत योजना, पासपोर्ट आणि आधार नोंदणी/अद्ययावत अशा अनेक नागरिक-केंद्रित सेवा दिल्या जातात. आता त्यात महानगर गॅस बिल भरण्याच्या सेवेची भर पडल्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली अनेक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. रत्नागिरीतील महानगर गॅसच्या सर्व ग्राहकांनी या नवीन आणि सुलभ सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे संयुक्त आवाहन अधीक्षक डाकघर ज्ञानेश कुलकर्णी आणि महानगर गॅसचे जीएम हेड आशिष प्रसाद यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg