loader
Breaking News
Breaking News
Foto

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात गुरु -शिष्य परंपरेवर व्याख्यान

रत्नागिरी(जमीर खलफे)- गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय (गोवा) येथील गोविंद भारद्वाज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमधील महत्वाचा विषय म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार या विषयाची व्याप्ती समजून घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरु शिष्य नाते, गुरूंचे मार्गदर्शन, आपली बौद्धिक, भावनिक, व आध्यात्मिक प्रगती तसेच मूल्यशिक्षण ज्यामध्ये स्वयंप्रेरणा, त्याग, प्रेमभावना, समानता इ. चे महत्व त्यांनी स्लाईड शो व स्पष्टीकरणाद्वारे मांडले. भारतीय ज्ञान परंपरेचे यथार्थ दर्शन यामुळे विद्यार्थांनी अनुभवले. वाणिज्य विभाग उपप्राचार्य डॉ. सीमा कदम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तर डॉ. यास्मिन आवटे यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला. प्रास्ताविक प्रा. हर्षदा पटवर्धन यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg