श्रीवर्धन (संदेश घोलप): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या आगामी ९ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच दक्षिण रायगड व श्रीवर्धन तालुक्यात मनसेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. श्रीवर्धनमधील अंतर्गत असंतोष उफाळून आला असून पक्षाला मोठे भगदाड पडण्याची चिन्हे दिसत आहेत. गेली तब्बल पाच वर्षे श्रीवर्धन तालुका प्रसार माध्यम प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे सुनील विठोबा रिकामे यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपला राजीनामा तालुकाध्यक्ष मृदासभाई काशिनाथ तोंडलेकर यांच्याकडे सोपवला आहे.
वैयक्तिक कामाच्या व्यापामुळे पक्षाला वेळ देणे शक्य नसल्याचे अधिकृत कारण पत्रात दिले असले, तरी "माझी निष्ठा कालही, आजही आणि यापुढेही राजसाहेब ठाकरे व संपूर्ण ठाकरे परिवाराप्रती कायम राहील," असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दक्षिण रायगडमधील वरिष्ठ नेत्याच्या मनमानी कारभारावर तीव्र संताप मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील रिकामे यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण रायगड मनसेतील अंतर्गत वाद अधिकच तीव्र झाला आहे. दक्षिण रायगडमधील एका वरिष्ठ नेत्याच्या अहंकारी वागण्याला, गैरवर्तनाला आणि मनमानी कारभाराला कंटाळून पक्षातील आणखी काही महत्त्वाचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. रात्री-अपरात्री पक्षासाठी निष्ठेने राबणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांचे वागणे पटत नसल्याने मनसे सैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
९ ऑगस्टच्या दौऱ्याबाबत पोलादपूर येथे मनसेची पत्रकार परिषद दुसरीकडे, राज ठाकरेंच्या ९ ऑगस्टच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत पोलादपूर येथील हॉटेल बालाजी येथे पत्रकार परिषद पार पडली. या दौऱ्यात दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती मनसे कार्यालयाचे राज ठाकरेंच्या हस्ते भव्य उद्घाटन होणार आहे. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची राज ठाकरे पाहणी करणार आहेत. त्यानंतर पेण व पनवेल येथील मनसे कार्यालयांचे उद्घाटन पार पडणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.