loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रत्येक घरातील गृहिणी हि अन्नपुर्ण असते - जिप सदस्य अभिषेक विचारे

म्हसळा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा म्हसले नं.1 (कन्याशाळा) येथील सभागृहात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांच्या हस्ते करण्यात आले. म्हसळा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्टरित्या आयोजन केलेल्या पाककला स्पर्धेला जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना प्रत्येक घरातील गृहिणी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त असतात त्यातील अनेक घरातील गृहिणी आपला परीवार सांभाळून नोकरी, व्यवसाय करतात. हे करीत असतानाच त्या तितक्याच ताकदीने आदर्श गृहिणी म्हणून पाक कलेत तरबेज असतात. अर्थात त्या अन्नपुर्ण असतात अशा महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांना खासदार सुनिल तटकरे,नामदार आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातुन मोठे व्यासपीठ मिळवून दिले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांनी म्हसळा येथे पाक कलेत भाग घेतलेल्या गृहिणींचे कौतुक करताना व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिलांच्या कलागुणांना अधिक वाव देण्यासाठी येणाऱ्या आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी जाहीर करून सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पाककला स्पर्धेत 57 स्पर्धकांनी वेगवेगळे प्रकारचे स्वादिष्ट अन्न पदार्थ तयार करून सहभाग घेतला होता. स्पर्धेचे नियमानुसार गुणांकन परीक्षक स्वरा सचिन फुलेकर आणि उज्वला संतोष यवतकर यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राजक्ता ललित पाटील, द्वितीय समीना इमरान कोंडविलकर, तृतीय शालिनी बाळाकृष्ण सावंत, तर उत्तेजनार्थ पारितोषिक गौरी स्वपनील करडे व ज्योती सुरेंद्र आंबेतकर यांनी पटकावला. बक्षिस प्राप्त स्पर्धक आणि सहभागी सर्वच स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते आकर्षक भेट वस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर, पंचायत समितीचे सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, उपसभापती लहू म्हात्रे, पस सदस्या प्रियांका निंबरे, पस सदस्या समृद्धी चाचले, गण अध्यक्ष सतिश शिगवण, किरण पालांडे, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, सोनल घोले, रेशमा कानसे, वनिता खोत, हिरा बसवत, रेणुका पाटील, सरपंच रशमी सावंत, छाया म्हात्रे, नगर सेविका जयश्री कापरे, सरोज म्हशीलकर, वृषाली घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg