loader
Breaking News
Breaking News
Foto

कुडाळच्या कचरा डेपोत सॅग्रीकेशन कोलमडले, 8 दिवसांत विल्हेवाट नाही लावल्यास आंदोलन; नगरसेवक मंदार शिरसाट

कुडाळ - कुडाळ शहरात घंटागाड्यांमार्फत गोळा होणाऱ्या ओला-सुका कचऱ्याचे सॅग्रीकेशन सांगिर्डेवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाण पसरली असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत ठाकरे गटाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आज सोमवारी कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला 8 दिवसांत विल्हेवाट लावण्याचा इशारा दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुडाळ न.पं.चे कर्मचारी नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा गोळा करतात. मात्र डम्पिंग ग्राऊंडवर दोन्ही कचरा एकत्रच टाकला जात आहे. पावसाळ्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर कुत्रे, कावळे मोठ्या संख्येने दिसत आहेत. पाहणीवेळी नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, "मी कोणावर टीका करायला आलेलो नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांचे प्रश्न मांडणे हे माझे कर्तव्य आहे. हा कुडाळ शहरासाठी सेन्सिटिव्ह विषय आहे.

टाईम्स स्पेशल

येत्या 8 दिवसांत येथील कचऱ्याचे सॅग्रीकेशन करून योग्य विल्हेवाट लावा. अन्यथा आमची भूमिका वेगळी राहील." यावेळी ठाकरे सेनेचे संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, गुरू गडकर उपस्थित होते. न.पं.चे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देत कचरा प्रश्नी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg