loader
Breaking News
Breaking News
Foto

पन्हळीत पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या नांगराने शेत लावणी

मंडणगड (प्रतिनिधी) : ट्रॅक्टरच्या सर्रास वापरामुळे आता लाकडी अवजारांना ब्रेक बसला असला तरी काही ठिकाणी आजही बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात मजुरांची कमी जाणवू लागल्याने शेतकरी कुटुंबालाच शेती कामात राबावे लागत आहे. सध्या पाऊस मुबलक प्रमाणात बरसत असल्याने अतिवृष्टीमध्ये झालेल्या पूर परिस्थितीमुळे काही शेतांमध्ये पुराच्या पाण्याबरोबर रेतीमिश्रित कचरा वाहून आल्यामुळे तेथील रोप लावणी योग्य वाढीस झालेले नाहीत. तरी काही ठिकाणी उगवण चांगली झालेल्या रोपांची लावणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. उशिरा का होईना बळीराजा शेतीच्या कामात मग्न असल्याचे चित्र सद्या मंडणगडात पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पारंपारिक भात लागवडीमुळे भाताचे उत्पादन मात्र कमी होत चालले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत नाही, बैलजोडीचा सांभाळ करणं अवघड होत असून बैलजोडीच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेती कामासाठी लागणाऱ्या लाकडी अवजारांच्या वाढत्या किमती, दुरुस्तीचा खर्च अवाक्य बाहेर जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टरच्या साह्याने मोठया प्रमाणात शेतीची कामे होत असून यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचत आहे. एक एकर शेतीच्या नांगरणीसाठी लागणारा सात ते आठ दिवसांचा कालावधी आज काही तासांवर आल्यामुळे कामे वेळेवर होत आहेत तसेच मजूर मिळत नसल्याने शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसंती दिली जात आहे.

टाईम्स स्पेशल

तरीसुध्दा आजही काही ठिकाणी बैलजोडीच्या सहाय्याने शेत नांगरणी करून भात शेतीची कामे पारंपरिक पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी भात लावणी वेळी पावसापासून बचावासाठी डोक्यावर घेण्यात येत असलेले ईरले आणि घोंगडी ची जागा आता प्लास्टिक कापडाने घेतली आहे. ती साधनं आता पाहायला मिळत नाहीत मात्र बैलजोडीचा वापर करून नांगरणी आजही केली जात आहे. बैल जोडीच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या नांगरणीचे चित्र पन्हळी खुर्द सह म्हाप्रल खाडीपट्टयात आणखीन आठ दहा दिवस लावणीची लगबग पाहता येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg