खेड (प्रतिनिधी) - स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या शैक्षणिक वर्ष 2025 -26 मधील नीट व वाणिज्य शाखेतील विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय मालपाणी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केल्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी यांच्या शुभहस्ते सत्कार समारंभाचे प्रमुख मान्यवर डॉ. संजय मालपाणी (राष्ट्रीय कार्याध्यक्ष गीता परिवार) यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पोट्रेट देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या भव्य सत्कार सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. संजय मालपाणी यांनी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडचा विशेष गौरव करत, "यशाची शिखरे गाठणाऱ्या शाळांमध्ये रोटरी स्कूलचे स्थान निश्चितच अग्रक्रमाचे आहे," असे गौरवोद्गार काढले. इमारतींमुळे शाळा मोठी होत नाही; तर त्या शाळेत घडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळेच तिची खरी ओळख निर्माण होते, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडविणारी ही शाळा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. भगवद्गीतेतील प्रेरणादायी दाखल्यांच्या माध्यमातून त्यांनी जीवनमूल्यांचे महत्त्व उलगडून सांगत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुसंवाद, सकारात्मक विचार आणि आनंदी वृत्ती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभिव्यक्तीला योग्य वाव मिळाला पाहिजे, तसेच त्याच्या आनंदाला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
सदरच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले, रोटरी प्रतिष्ठानचे खजिनदार रो. उमेश संसारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रो. जोगेश साडविलकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. मंदार संसारे, रो. अभय तलाठी, रो. लक्ष्मीकांत पटेल, रो. संतोष गिल्डा, रो. आदित्य गांधी, रो. संकेत बुटाला, रो. सचिन करवा, रो. डॉ. समीर मंडपे, रो. डॉ. रोशन उतेकर, रो. मयुरेश पेठे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, राहुल गाडबैल, शैलेश देवळेकर, देवयानी महाजन, तेजश्री कानडे, प्रितम वडके, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संजय मालपाणी यांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल मंडलिक, प्रा. भक्ती करंबेळकर, प्रा. धनुजा धूत यांनी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.