loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा युवा मोर्चा मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी पेंडूर येथील ‘सुमित सावंत’ यांची निवड

मालवण(प्रतिनिधी)- भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमोच्या मालवण- ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदिप चंद्रकांत मेस्त्री यांनी या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले आहे. सुमित सावंत यांच्या या निवडीमुळे मालवण-ग्रामीण भागात भाजप संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीस भाजयुमो जिल्हाध्यक्ष ‘संदीप मेस्त्री’, युवा मोर्चा सरचिटणीस ‘संतोष पुजारे’, जावेद खतीब, युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश रावराणे, राकेश सावंत, मालवणचे नगरसेवक ललित हरी चव्हाण, देवेंद्र शेटकर(जिल्हा चिटणीस), कुडाळ युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, प्रसाद कृष्णा पाटकर, कुडाळचे युवा अध्यक्ष तन्मय वालावलकर, मयूर राणे, विनेश तावडे, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, परेश कांबळी, सागर पवार, शुभम परब, कणकवली युवा अध्यक्ष सर्वेश दळवी, देवगड भाजप अध्यक्ष अतुल सरवटे, कणकवली भाजयुमो सरचिटणीस प्रशांत राणे, कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, युवा तालुकाध्यक्ष सहदेव खाडे, नयन दळवी आणि बांदा पक्ष युवा अध्यक्ष सिद्धेश कांबळी, पराशर सावंत यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

सुमित सावंत यांच्या निवडीबद्दल भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांसह स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg