loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी ७० व्या वर्षानिमित्त ७० विद्यार्थी दत्तक घेणार

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या स्थापनेच्या ७० व्या वर्षानिमित्त क्लबने “७० विद्यार्थी दत्तक” हा महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथील २५ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शालेय गणवेश तसेच संपूर्ण वर्षाचे परीक्षा शुल्क देऊन शैक्षणिक मदत करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधार निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे, सचिव रोटेरियन आनंद चौगुले, ज्येष्ठ रोटेरियन धर्मसीभाई चौहान, रोटेरियन निलेशजी मुळ्ये, रोटेरियन विजयजी चव्हाण तसेच भावे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणात सातत्य राखण्याचे आवाहन केले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी शिक्षण, आरोग्य आणि समाजोपयोगी उपक्रमांद्वारे समाजसेवेची परंपरा जोपासत असून, वेगवेगळ्या शाळेतील ७० विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा संकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार असून उर्वरित विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg