loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेला २ कोटी ८७ लाख रु. नफा; अध्यक्ष कृष्णा आडणेकर

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात २ कोटी ८७ लाख रुपयांचा नफा झाला आहे. तर संस्थेने यावर्षी १२५ कोटी ५१ लाख रुपये ठेवींचा टप्पा गाठला आहे. संस्थेची या वर्षातील आर्थिक लढा उलाढल २१३ कोटी रुपये असून सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेने यावर्षीही आपला ऑडिट वर्ग अ कायम राखला आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष कृष्णा उर्फ प्रकाश आडणेकर यांनी सिंधुदुर्ग येथे केले. आज रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३९ वी वार्षिक सभा संस्थेच्या पी.एफ. सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष आडणेकर बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेच्या सुरूवातीला जिल्हा सहकार मंडळाचे विकास अधिकारी पांचाळ तसेच तात्यासाहेब मोहिते, सहकार प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य कुंभार यांनी उपस्थित सर्व सभासदांना सहकार कायद्याबाबत तसेच सभासद हक्क याबाबत माहिती व सहकार प्रशिक्षण दिले. यावेळी उपाध्यक्ष देविदास आडारकर, संचालक दिनेश खवळे, राजन साळुंखे, वासुदेव वरवडेकर, अनघा तळावडेकर, वर्षा मोहिते, राजेश चव्हाण, प्रविण सावंत, राजेंद्र शिंगाडे, चेतन गोसावी, विलास चव्हाण, बाळकृष्ण रणसिंग, अमित गंगावणे तसेच संस्थेचे तज्ञ संचालक भाग्यवंत वाडीकर उपस्थित होते. सुरुवातीला संस्थेच्या निधन झालेले सभासद, सहकार क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, देशबांधव तसेच कारगील युद्धात शहिद जवान श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इ. १० वी, इ. १२ वी तसेच इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

वार्षिक अधिमंडळ सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन सचिव निलेश ज. कुडाळकर यांनी केले. तर सूत्रसंचालन संचालक दिनेश खवळे यांनी केले. त्यानंतर अहवाल वाचन, आर्थिक पत्रकांना मंजूरी, नफा विभागणी मंजूरी, ऑडीट रिपोर्ट वाचन, अंदाजपत्रक मंजूरी, बँक कर्ज उचलीस मंजूरी, वैधानिक लेखा परिक्षकांची नेमणूक, आदर्श उपविधी २०२६ ला मंजुरी व अन्य विषयावर सविस्तर चर्चा होऊन मंजूरी देण्यात आली. यावेळी सभासद श्रीप्रसाद मराठे, राजन ठाकूर, दशरथ गावडे, सूर्याजी पवार, चेतन नेरूरकर, पुंडलिक पार्सेकर, संतोष राणे, सुनिल राठीवडेकर, प्रफुल्ल गायकवाड, मंगेश गावडे, भालचंद्र दाभोलकर, दिपक तारी यांनी चर्चेत भाग घेतला. संस्थेचे संचालक दिनेश खवळे यांचा सेवानिवृत्तीपर व अमित गंगावणे यांचा राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अध्यक्षांचा हस्ते संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संचालिका अनघा तळावडेकर यांनी उपस्थित सर्व सभासद, पत्रकार, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg