loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना छत्री वाटप

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व कार्यसम्राट आमदार, भास्करशेठ जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, गुहागर शहरच्या वतीने आज एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पावसात, उन्हात, कधी कोरोना काळात न थकता शहर स्वच्छ ठेवणाऱ्या, पाणीपुरवठा करणाऱ्या आणि आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र जागणाऱ्या गुहागर नगरपंचायतीतील सफाई कर्मचारी, पाणी कर्मचारी व सुरक्षा रक्षक या खऱ्या कोरोना योद्ध्यांना आज छत्री भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख सिद्धिविनायक जाधव, गटनेते व नगरसेवक समीर बागकर, नगरसेविका श्रिया मोरे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपशहर प्रमुख प्रवीण रहाटे, ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र आरेकर, शहर संघटिका सारिकाताई कनगुटकर, माजी नगराध्यक्ष स्नेहाताई वरंडे, युवासेना तालुकाप्रमुख निनाद नार्वेकर, युवासेना शहरप्रमुख राज विखारे, महिला उपशहर संघटिका संगीता वराडकर, शिवसेना ग्राहक मंच तालुका प्रमुख आदेश मोरे, नीताताई गुरव, वृंदा शिंदे, विभाग प्रमुख समीर कनगुटकर, शब्बीर माहीमकर, गुहागर शहर आरोग्य सेनाप्रमुख पराग मोरे, शाखाप्रमुख प्रभुनाथ देवळेकर, शाखाप्रमुख चेतन जांगळी, अनिकेत भोसले, दिलीप गुरव, विलास वाघधरे, राहुल कनगुटकर, रुपेश गोयथळे, युवासेना विभाग प्रमुख सुजल होळंब, युवासेना शाखा अधिकारी आर्यन पाटील, तसेच नगरपंचायतीतील सर्व कर्मचारी, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg