loader
Breaking News
Breaking News
Foto

डाॅ.विनय नातू यांची आंबेड खुर्द येथील कुणबी भवनला भेट

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सिंधूरत्न समृद्ध योजना २.०० रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथील कुणबी भवनाला भेट देऊन पाहणी केली. कुणबी भवनाचे स्वरूप पाहून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे कुणबी भवन शासकीय योजनेतून उभे राहिले पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. परिसरातील भविष्यकालीन पर्यटन लक्षात घेता या भवनाचा उपयोग पर्यटक निवासासहित विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण व शिक्षणाच्या निवासासाठी व्हायला हवा असे सांगताना डॉ. नातू यांनी या भवनाचे कामाबाबत समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कडवई जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे , संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती कृष्णाजी हरेकर व व्यावसायिक विजय कुवळेकर यांनी डॉ. नातू यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी जि.प.सदस्य संतोष थेराडे, जि.प.माजी सदस्य दीपक जाधव, व्यावसायिक विजय कुवळेकर, श्रीनिवास पेंडसे, दिलीप बडद,श्रीरंग कुंभार, प्रदीप चांगले तसेच कुणबी भवनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg