मालवण (प्रतिनिधी) - मालवण देऊळवाडा येथे सागरी महामार्गावर भरणारा आठवडा बाजार बंद करून तो पूर्वांपारपणे सोमवारपेठेत एकत्रितरित्या भरवावा, अशी मागणी मालवण मधील व्यापाऱ्यांनी नगरपालिकेकडे केली असताना या मागणीला देऊळवाडा येथील नागरिकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. देऊळवाडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकत्रित बैठक घेऊन देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करू नये, हा बाजार देऊळवाडा तसेच मालवणच्या आजूबाजूच्या गावातील लोकांना सोयीचा ठरत असल्याने बाजार येथेच भरला पाहिजे, अशी एकमुखी भूमिका मांडली. मालवण सोमवारपेठेत भरणारा आठवडा बाजार कोरोना काळापासून देऊळवाडा सागरी महामार्गावर विभाजित करून भरविण्यात आला. मात्र देऊळवाडा येथे भरणारा आठवडा बाजार बंद करून तो पूर्वीप्रमाणेच सोमवार पेठेत एकत्रितरित्या भरविण्यात यावा अशी मागणी मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून नगरपालिकेकडे करण्यात आली होती. परंतु, या मागणीला देऊळवाडा भागातील नागरिकांनी आक्षेप घेत देऊळवाडा येथील बाजार सोमवार पेठेत हलविण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत आज सायंकाळी उशिरा देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात नागरिकांनी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीसाठी देऊळवाडा भागासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.
देऊळवाडा येथे भरणारा आठवडा बाजार हा देऊळवाडा तसेच एसटी स्टॅन्ड परिसर, रेवतळे, वायरी, आडवण, आडारी या भागांसह बाजूच्या खैदा कातवड, कुंभारमाठ आदी गावातील नागरिकांसाठी सोयीस्कर असून बाजारात ये - जा करण्यासाठी सोयीचे पडत आहे. देऊळवाडा येथील बाजारापासून एसटी स्टॅन्ड तसेच रिक्षा स्टॅन्ड जवळ असल्याने बाजूच्या गावातील ग्राहकांना प्रवास खर्च देखील कमी येत आहे. या बाजारामुळे सोमवारपेठेत होणारी गर्दी व वाहतूक कोंडी कमी होत आहे. या बाजारामुळे देऊळवाडा येथे वाहतूक कोंडी होत असल्यास त्यावर मार्ग काढून वाहतूक सुरळीत करता येईल, अशी मते यावेळी उपस्थित नागरिकांनी मांडत देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करू नये, अशी एकमुखी भूमिका घेतली. याबाबत मालवण नगरपालिकेला देखील देऊळवाडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांतर्फे निवेदन सादर करून देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करू नये अशी आग्रही मागणी करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी गणेश गावकर, हरेश फणसेकर, पुनम चव्हाण, नीना मुंबरकर, जगदीश गावकर, सौगंधराज बादेकर, उत्सुक गावकर, ऍड. अक्षय सामंत, नामदेव घाडीगावकर, बंटी चव्हाण, पराग चव्हाण, भूषण चव्हाण, दशरथ कवटकर, भूषण म्हापणकर, किसन मांजरेकर, महेश गावकर, संकेत भाटे, शिवाजी म्हापणकर, पांडू फणसेकर, समीर शिंदे, केदार गावकर, नितीन तोडणकर, प्रथमेश मालवणकर, सुहास वालावलकर, राहुल केळुसकर, अक्षय माणगावकर, प्रमोद मराळ, मधुरा तुळसकर, राज मोंडकर, किरण चव्हाण, रवी मालवणकर, उमेश चव्हाण, कमा गावकर, ऍड. सुमित जाधव, सुभाष मालवणकर, दर्शन मुंबरकर, प्रमोद गावकर, हरेश मुंबरकर, दशरथ वालावलकर, मंदार गावकर, श्रेयस माणगावकर, विलास अभ्यंकर, गौरव लाड, सुहास गावकर, शेखर केळुसकर, सोहम देऊलकर, शीला चव्हाण, विश्वास आचरेकर, सोमेश गावकर, राहुल वीर, चेतन वीर, युवराज गावकर, नागेश कांदळकर, दिनेश किडये, अभिषेक कांदळकर, सुशांत किडये, राजन गावकर, संतोष इब्रामपुरकर, रवी कासले, दिंगबर बगाड, रमाकांत फाटक, अमित बोर्डवेकर व इतर नागरिक, महिला आदी उपस्थित होते.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.