loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी पदविधर शिक्षक मोहन उपानेकर गुरुजी यांच्या प्रयत्नाने ठाणे-मुंबई प्रवाशांसाठी एस. टी. सुरु

खेड - खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता तसेच माजी प्रभारी मुख्याध्यापक व माजी पदविधर शिक्षक उपानेकर गुरुजी यांनी प्रवाशांसाठी सुरु केलेल्या गाड्या सकाळी १०.३० खेड तुळशी बोरीवली, रातराणी २०.३० खेड तुळशी बोरीवली, सकाळी ८.३० खेड तुळशी ठाणे नालासोपारा विरार तसेच सकाळी १०.०० खेड तुळशी कल्याण विठ्ठलवाडी या गाड्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांचे यासाठी खूप योगदान आहे. या पंचक्रोशीमध्ये ग्रामिण भागातून शहरी भागाला जोडण्यासाठी जी जीवनवाहिनी आहे ती आपली लालपरी उपानेकर गुरुजी यांच्यामुळे सुरु झालेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी विभागाचे नवनिर्वाचित विभाग नियंत्रक जानराव (डि.सी) यांच्या सहकार्याने सन गौरी गणपतीसाठी यावेळी लवकरच गाड्या लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व गणेश भक्तांनी या फेऱ्यांचा लाभ घेऊन आपल्या रत्नागिरी विभाग खेड आगाराला सहकार्य करावयाचे आहे. उत्कृष्ट व शिस्तबंध कार्यपद्धती संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ डेपोमध्ये प्रशासनावर उत्तम पक्कड असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ डेपोमध्ये उत्तम प्रशासन चालू आहे. त्यामुळे एसटीला फायदा होईल व एसटीचे उत्पन्न वाढेल व प्रवाशांना आनंदीदायी प्रवास करता येईल. रत्नागिरी जिल्ह्यासाठी जानराव यांच्या सारख्या डि.सी साहेबांची गरज होती ती गरज महाव्यवस्थापक मुंबई सेंट्रल यांच्याकडून पूर्ण झालेली आहे. प्रशासन कसे असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जानराव (डि.सी) हे आहेत. त्यांच्या उत्तम कार्यपद्धतीवर सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg