loader
Breaking News
Breaking News
Foto

रसाळगड किल्ल्याच्या दुरावस्थेवरून पुरातत्व विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह

खेड - खेड तालुक्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील या ऐतिहासिक किल्ल्यावर पुरातत्व विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून संवर्धनाची कामे करण्यात आली आहेत. मात्र, या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोट्यवधी रुपये खर्च करूनही किल्ल्याचे दगड कोसळत असल्याचा आरोप महाराजा प्रतिष्ठानचे सचिव आणि दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी केला आहे. पुरातत्व विभागाने केलेल्या कामाची पाहणी करून निष्कृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासन काय भूमिका घेतं, याकडे आता लक्ष लागलं आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg