loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वप्नांना दिशा, यशाला भरारी; रोटरी प्रतिष्ठान खेडच्या गुणवंतांचा सन्मान

खेड (प्रतिनिधी) - शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी बुटाला हॉल, महाड येथे रोटरी प्रतिष्ठान खेड व हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 - 26 मधील जेईई, नीट व सीईटी या परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसाद बिडवे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केल्यानंतर रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल व रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडचे उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल यांच्या शुभहस्ते सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे सिनियर सेल्स अँड प्रॉडक्ट स्पेशालिस्ट प्रसाद बिडवे व इतर मान्यवर रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट महाडचे अध्यक्ष रो. चेतन पालांडे, रोटरी क्लब ऑफ महाडचे अध्यक्ष रो. राजीव वनारसे, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी संतोष बुटाला, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट महाडचे सदस्य रो. प्रदीप शेठ, गुरुकुल अकॅडमी महाडच्या मुख्याध्यापिका वासंती राजप्पन यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भव्य सत्कार सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रसाद बिडवे यांनी आज इयत्ता बारावी तसेच नीट व जेईई या परीक्षांमध्ये मिळालेले यश उल्लेखनीय आहे असे सांगितले. तुमचे हे यश केवळ तुमच्या बुद्धिमत्तेचे फलित नसून तुमची मेहनत, सातत्य, शिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचा सुंदर परिणाम आहे. तुम्ही मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. मात्र, हे यश तुमच्या प्रवासाची अंतिम पायरी नसून एका उज्ज्वल भविष्यातील पहिली पायरी आहे. म्हणूनच पुढील वाटचालीतही मेहनत, नम्रता, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास कायम ठेवा. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजात चांगले बदल घडवण्यासाठी करा, असे सांगितले. त्यानंतर चेतन पालांडे व राजीव वनारसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित पालकांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की, “रोटरी अकॅडमी, महाडमुळे महाड परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची आणि आपल्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याची उत्तम संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अकॅडमीचे योगदान कौतुकास्पद आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य शैक्षणिक वातावरण यामुळे आमच्या मुलांना नीट व जेईई तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी आत्मविश्वासाने तयारी करता येत आहे. महाडमध्येच उत्तम शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही रोटरी अकॅडमीचे मनःपूर्वक आभार मानतो."

टाईम्स स्पेशल

विद्यार्थी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी असे सांगितले की, महाडमध्ये नीट व जेईई आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांची चांगली तयारी करण्याची संधी आम्हाला रोटरी अकॅडमीमुळे मिळाली. येथील शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा, शंकांचे निरसन आणि अभ्यासासाठी मिळणारे योग्य वातावरण यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. आमच्या यशामागे शिक्षकांची मेहनत, पालकांचा विश्वास आणि आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा मोठा वाटा आहे. रोटरी अकॅडमीने आम्हाला केवळ अभ्यास शिकवला नाही, तर ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याची प्रेरणाही दिली. सदरच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी रोटरी अकॅडमी महाडचे विभागप्रमुख संतोष वडके, रोटरी अकॅडमी महाडच्या विभागप्रमुख विजया पाटेकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमातील अविस्मरणीय क्षणांचे व्हिडिओ शूटिंग वैभव माटवणकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धी दामले व दर्शना दांडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया चिले यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg