loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतून आपल्या घरी जाताना दुर्दैवी अंत; नर्सिंग विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू; दापोलीत खळबळ

दापोली( प्रतिनिधी )- दापोली-खेड मार्गावरील वाकवली महसुली गावाच्या हद्दीत शिरशिंगे फाटा येथे मंगळवारी २८ जुलै रोजी सकाळी झालेल्या भीषण दुचाकी अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारी सेजल भागवत (वय २२) हिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे दापोलीत शोककळा पसरली आहे. तिच्या सोबत प्रवासा दरम्यान असलेली तिची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत अहिरे ही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दोघीही दापोलीतून आपल्या गावी जात असताना सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनास्थळावरील परिस्थितीवरून दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने किंवा समोरून येणार्‍या वाहनाने हूल दिल्याने दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळून दोघी रस्त्याच्या छोट्या पुलाखालील वाहत्या पाण्यात फेकल्या गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सेजल मोरीत साचलेल्या गाळात अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत तब्बल ४५ मिनिटांच्या शोधानंतर तिला बाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. वैष्णवीला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

२५ जुलै रोजी नर्सिंगच्या अंतिम परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन दोघीही भविष्यातील स्वप्ने उराशी बाळगून आनंदात घरी निघाल्या होत्या. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्याला एका क्षणात वेगळे वळण दिले. सेजलच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून दापोली उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दोघींचेही आई-वडील नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास असल्याने या दुर्घटनेने त्यांच्यावर तसेच परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg