लांजा (संजय साळवी) - विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक आपल्या आवडीनुसार ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने मार्गक्रमण करताना जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा उपयोग केल्यास यशाचे शिखर निश्चित गाठता येईल असे प्रतिपादन कडवई संगमेश्वर येथील भाईशा घोसाळकर माध्यमिक प्रशालेतील प्रा. मिलिंद कडवईकर यांनी केले. कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा या संस्थेच्यावतीने आयोजित शिक्षण, कला, कृषी व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणार्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ नुकताच कुलकर्णी - काळे छात्रालय लांजा येथे पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच कुणबी समाजातील इयत्ता दहावीमध्ये ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणार्या आणि इयत्ता बारावीमध्ये ७० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
याशिवाय पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचाही सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावित या उद्देशाने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. त्याचबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात बी. ए. एम. एस. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉ. आकांक्षा सनगरे, राज्य शासनाचा कृषी क्षेत्रातील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त दयानंद चौगुले, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त कु. ईश्वरी सुवारे तसेच राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त कु. आरोही शिंदे या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रा. मिलिंद कडवईकर यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचार पूर्वक निवडावे. आपली आवड, क्षमता व भविष्यात असणार्या संधी यांचा मेळ घातला जाणे आवश्यक आहे.
लहान वयातच आपलीआवड ओळखली की भविष्यात यशस्वी होणे फार कठीण राहत नाही. सीईटी तसेच स्पर्धा परीक्षा यासाठी आवश्यक तयारी कशी करावी याविषयी देखील त्यांनीविद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक शांताराम गाडे, नंदकुमार आंबेकर, भालचंद्र कांबळे, संचालिका दर्शना बेंद्रे, प्रज्ञा हरमले, मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप डाफळे, शाखाधिकारी संतोष घडशी, गंगाराम कालकर, सचिन रामाणे, महेश बर्वे यांच्यासह नाना मानकर, सुधाकर कांबळे, शरद खांदारे, हरिश्चंद्र मंचेकर निलेश सुवारे, निलांबरी परवडी, वृषाली दरडे, विद्यार्थी, पालक व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष विलास दरडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रभाकर सनगरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप डाफळे यांनी केले.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.