पनवेल :- रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज (दि. ८) चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे झालेल्या या मेळाव्यात तब्बल ६४ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने रोजगाराच्या विविध क्षेत्रांतील संधी उमेदवारांसाठी उपलब्ध झाल्या. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविधकौशल्ये असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सकाळपासूनच मेळाव्याच्या ठिकाणी युवक-युवतींची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन पनवेलचे महापौर नितीन पाटीलयांच्या हस्ते झाले. या मेळाव्यास ज्येष्ठ नेते वमाजी नगराध्यक्ष जे. एम.म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, नगरसेवक दशरथ म्हात्रे, डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, रवींद्र भगत, समीर ठाकूर, राजू सोनी, एकनाथ गायकवाड, मधु पाटील, प्रवीण पाटील, अमरपाटील, विकास घरत, नगरसेविका प्रतिभा भोईर, सीता पाटील, जिल्हा परिषद सदस्या कमला देशेकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, काशिनाथ पार्टे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, स्वप्निल ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, ऍड.चेतन जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, कामगार नेते जितेंद्र घरत, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाईक, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, भाजपचे शहर चिटणीस रुपेश नागवेकर, ओबीसी सेलचेराजेश गायकर, रामनाथ पाटील, डॉ. संतोष आगलावे, युवा मोर्चाचे नविन पनवेल अध्यक्ष मयूर कदम, पनवेलशहर अध्यक्ष हिमेश बहिरा, चिन्मय समेळ, अक्षय सिंग, विश्वजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा देणे, या उद्देशाने भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले. ६४ कंपन्यांच्या सहभागामुळे विविध उद्योग आणि रोजगार क्षेत्रांतील संधी एकाच छताखाली उपलब्ध झाल्या. यामध्ये २५०२ उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांना रोजगाराच्या संधीं सोबतच करिअर विषयक मार्गदर्शन आणि उद्योगक्षेत्रातील आवश्यक कौशल्यांची माहिती मिळाली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.