loader
Breaking News
Breaking News
Foto

गुरुपौर्णिमेनिमित्त कोळंबे येथे तृतीय पालखी परिक्रमा सोहळ्याचे आयोजन

रत्नागिरी :आगामी बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्वामी समर्थ ध्यान मंदिर, कोळंबे येथे 'तृतीय पालखी परिक्रमा सोहळा' अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सर्व स्वामी भक्तांकडून केली जात असून, परिसरातील भाविकांमध्ये या कार्यक्रमाविषयी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. ​या भव्य सोहळ्याची सुरुवात बुधवारी सकाळी ७:३० वाजता नित्याच्या आरतीने होईल. त्यानंतर सकाळी ८:३० ते ११:०० या वेळेत पादुका अभिषेक संपन्न होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत दत्तयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक विधीनंतर दुपारी १:०० ते ३:०० या वेळेत महाप्रसाद आणि भजनाचा कार्यक्रम पार पडेल. दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत पारायणासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. ​मुख्य आकर्षण असलेला पालखी परिक्रमा सोहळा सायंकाळी ५:३० वाजता सुरू होईल. सायंकाळी ७:०० वाजता पालखीचे मंदिरात आगमन व प्रवेश होईल. त्यानंतर सायंकाळी ७:१५ वाजता नित्य स्वामी नाम जप आणि ७:३० वाजता नित्याची आरती होईल. रात्री ८:०० वाजता खिचडी प्रसाद, रिंगण सोहळा आणि स्वामी नामाच्या गजराने या संपूर्ण महोत्सावाची सांगता होईल.

टाईम्स स्पेशल

या पवित्र आणि मंगलमय सोहळ्यात परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन सर्व स्वामी भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg