loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीला कायम स्वरूपी ग्रामसेवक मिळाला नाही तर १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार - ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीसाठी कायम स्वरूपी ग्रामसेवक नसल्याने येथील ग्रामस्थांची कामे प्रलंबित राहत आहेत. सद्या असणारे ग्रामसेवक कायम स्वरूपी नसल्याने व आठवड्यातून दोनच दिवस उपलब्ध असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चालवीणे कठीण झाले आहे. या ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळावा म्हणून ग्रा. पं. सदस्या हर्षा आठल्ये व ग्रामस्थ १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती येथे उपोषणाला बसणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोंडगावं ग्रामपंचायत ही तालुक्यातील दोन नंबरची मोठी आहे. त्यामुळे पंधरा ऑगस्टपूर्वी कायमस्वरूपी ग्रामसेवक न मिळाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामस्थांसह पंचायत समिती समोर सकाळी ठिक ११ वाजता ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी सांगितले. याबाबतीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती सभापती संगमेश्वर (देवरुख) यांना ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg