loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे जिल्हास्तरीय बाल सुरक्षा व वाहतूक विषयक बैठक संपन्न

नवी मुंबई, : पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई येथील संवाद हॉलमध्ये जिल्हास्तरीय बाल सुरक्षा व वाहतूक विषयक बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) गावडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. बैठकीस नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शाळा प्रतिनिधी, शालेय बस मालक, स्कूल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन करत शालेय वाहनांमध्ये VLTT (GPS) प्रणाली अनिवार्य करणे, अग्निसुरक्षा (Fire Safety) नियमांचे पालन, डिजिटल उपस्थिती प्रणाली, सीसीटीव्ही फुटेज किमान तीन महिने जतन करणे, नियमित विद्यार्थी–पालक बैठकांचे आयोजन, शालेय वाहनांच्या भाडे निश्चितीचा अधिकार RTA कडे राहणे, चालकांचे मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र, ६ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी महिला अटेंडंटची नियुक्ती तसेच प्रत्येक चालकाने दरवर्षी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सादर करणे आदी महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली. कार्यक्रमात पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे तसेच पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल खाडे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शाळा प्रशासन, शालेय वाहन चालक, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स व पालक यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पोलीस, परिवहन विभाग, शाळा प्रशासन, वाहन मालक व पालक यांच्या समन्वयातून सुरक्षित, शिस्तबद्ध व अपघातमुक्त शालेय वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहनही करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

याच बैठकीदरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेने विविध अपघातांमध्ये जखमींना तातडीने मदत करून प्राण वाचविणे तसेच नागरिकाभिमुख सेवा बजावल्याबद्दल पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत अधिकारी व अंमलदारांचा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पनवेल शहर वाहतूक शाखेच्या उल्लेखनीय कार्याचे विशेष कौतुक करत भविष्यातही नागरिकाभिमुख, कर्तव्यदक्ष व जनहिताची सेवा अशाच तत्परतेने सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg