loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात रंगल्या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा लांजा येथील लांजा वंजारी नियर कॉलेज येथे दिनांक 6 ऑगस्ट रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेचे परीक्षण अभिनेते सतीश सलागरे व अनेक सिरीयल दिग्दर्शक अरुण रांजणकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी रत्नागिरी संगमेश्वर लांजा राजापूर तालुक्यातील महाविद्यालयाने भाग घेतला होता. सर्वच एकांकिका लक्ष वेधून घेत होत्या. त्यामध्ये लांजा महाविद्यालयाची मुकुट ही एकांकिका सर्वांचेच लक्ष वेधून गेले. या एकांकीका चे लेखक प्रसन्न बेंडखळे, दिग्दर्शक महेश बामणे तसेच पार्श्वसंगीत प्रदीप कांबळे, प्रकाश योजना दयानंद चव्हाण यांनी केले होते.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धांच्या वेळी बोलण्यासाठी स्पीकरची नव्हती मात्र पार्श्वसंगीतासाठी लाऊड स्पीकर ची व्यवस्था होती. मुकुट या एकांकिकामधून कलाकारांची व्यथा मांडण्यात आली होती कोकणातील नमन कलेचा वारसा जपण्यासाठी व त्या कलाकारांच्या व्यथा मांडणारी ही एकांकिका होती. लांजा महाविद्यालयाच्या या एकांकिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg