loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवली येथील कै.संतोष कारेकर यांचे निधन

गुहागर(प्रतिनिधी)- गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील रहिवासी तसेच तळवली बाजारपेठेतील जुने व्यावसायिक कै.संतोष कारेकर यांचे बुधवारी मध्यरात्री १२:४० च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने तळवली परिसरावर शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कै.संतोष कारेकर हे एक मनमिळावू व्यक्तिमत्व होते. गेली अनेक वर्षे तळवली बागकर स्टॉप येथे त्यांचे जनरल स्टोअर होते. त्यामुळे त्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक माणसे जोडली होती. गेले काही दिवस ते आजारी होते. अखेर बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, भाऊ असा मोठा परिवार आहे. तळवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवार दि.७ रोजी त्यांचा दशक्रिया विधी तळवली येथील स्मशानभूमीत पार पडणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg