loader
Breaking News
Breaking News
Foto

जल फाउंडेशन संस्थेचा ‘समाजभूषण पुरस्कार’ने गौरव

खेड (प्रतिनिधी) - दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, मुंबई येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात चिपळूण जिल्ह्यातील श्री भैरी भवानी प्रतिष्ठान, वीर या सामाजिक संस्थेतर्फे जल फाउंडेशन संस्थेला मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत जल फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची तसेच विशेषतः तालुक्यातील तहानलेल्या गाव-वाड्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्याची दखल घेऊन संस्थेला हा सन्मान प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा पुरस्कार म्हणजे जल फाउंडेशनच्या कार्यावर समाजाने दाखविलेला विश्वास आणि संस्थेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या निःस्वार्थ प्रयत्नांचा गौरव आहे. या आनंददायी आणि अभिमानास्पद क्षणी जल फाउंडेशन, कोकण विभागाचे विविध पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे हा सन्मान अधिकच संस्मरणीय ठरला. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा हा पुरस्कार सोहळा निश्चितच प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ‘कलगीतुरा’ कार्यक्रम. आपल्या पारंपरिक लोककलेचा सुंदर आविष्कार सादर करणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि संपूर्ण सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. जल फाउंडेशनच्या आजवरच्या सामाजिक कार्यात योगदान देणारे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, हितचिंतक आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार भविष्यात आणखी जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा देणारा ठरेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg